Girl Suicide : चाकण हादरलं! सोशल मीडियावरील प्रेम जिवावर बेतलं; प्रियकराच्या नकाराने तरुणीचा शेवट
Girl Suicide : सोशल मीडियावरून झालेली ओळख ठरली जीवघेणी; प्रियकराच्या नातेवाइकांच्या धमकावण्यामुळे तरुणीने पत्करले मरण, चाकण पोलिसांकडून तपास सुरू.

Girl Suicide – प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून तरूणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली. पूजा नामदेव मेश्राम (वय ३० रा. माऊली निवास, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पूजा हिच्या नातेवाइकांनी तसेच उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही एका खासगी कंपनीत कामाला होती. सुरूवातीला ती आपल्या मैत्रिणी सोबत राहण्यास होती. मात्र मैत्रिण दुसरीकडे राहण्यास गेल्याने सध्या ती एकटीच राहत होती. रविवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास पूजा यांच्या इमारतीमध्ये राहणारी मुलगी घरमालकाकडे आली.
पूजा हिची बहिण फोन करीत असून ती फोन उचलत नाही. तसेच दरवाजा आतून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे घरमालकाने दरवाजा उघडून आत पाहिले असता पूजा हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. पूजा हिचा मित्र दिल्लीमध्ये असून त्यांची सोशल मीडियावरून ओळख झाली. गाठीभेटीनंतर लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. मात्र त्या प्रियकराने अचानक दिला लग्नास नकार दिला. प्रियकराच्या नातेवाईकांनीही पूजा हिला फोन करून धमकावले. याबाबत तिने आपल्या घरच्यांनाही सांगितले. यामुळे नैराश्यातून तिने राहत्या घरी गळफास घेतला.




