Hidayat Patel | काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून 6 जानेवारी रोजी जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी फरार झाले होते. मात्र संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. उबेद पटेल हा 24 मे 2019 मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. नेमकं काय घडलं? 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होते. काल दुपारी2 वाजताच्या नमाजनंतर हिदायत पटेल मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पटेल यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. Hidayat Patel | यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हल्ल्यात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आणि उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. Hidayat Patel | पाच जणांवर गुन्हा दाखल दरम्यान, पटेल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नावे आहेत. कोण आहेत हिदायत पटेल ? हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून हिदायत पटेल यांना ओळखलं जात होते. अकोला जिल्हा काँग्रेसचे आठ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. ते 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक राहिले. सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते. 35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक राहिले आहेत. Hidayat Patel | हेही वाचा: Daisy Shah: घराजवळ आग लागल्यानंतर अभिनेत्री संतापली, म्हणाली… काही ‘बेवकूफ’ लोकांमुळे प्रकार घडला