नीलेश घायवळ, सचिन घायवळसह टोळीविरुद्ध ४५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : अॅडजंक्ट कंपनीकडून तब्बल ४५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी नीलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, आरोपींनी आपल्या नातलगाच्या नावाने बनावट दुग्धव्यवसाय कंपनीची नोंदणी करून त्या खात्यातून खंडणीची रक्कम स्वीकारली. ही कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सदर टोळीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि दबाव टाकून रक्कम देण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खंडणी, कटकारस्थान आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
या रकमेचा मागोवा घेण्यासाठी आणि अन्य सहकारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. तसेच या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे अन्य आर्थिक गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरु आहे.





