Pune News : Lotus Landmarks कलादालन फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
Pune News : कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका स्मिता सत्यप्रभा गिरी तसेच चेअरमन दातार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Pune News: सामाजिक बांधिलकी जपत Lotus Landmarks प्रस्तुत कलादालन फाउंडेशनच्या वतीने ३१ मार्च २०२६ रोजी कोथरूड परिसरातील Lotus Aman येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका स्मिता सत्यप्रभा गिरी तसेच चेअरमन दातार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देणे हा होता. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
तसेच कामगार आणि स्थानिक रहिवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.
या उपक्रमात Lotus परिवारातील सदस्य, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. आयोजकांनी सर्वांचे आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.





