Sanjay Jagtap : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षातील अनेक बडे नेते महायुतील घटक पक्षाकडे पक्षप्रेवश करताना दिसत आहे. आता पुणे जिल्ह्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप हात सोडून कमळ हाती घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संजय जगताप यांचा पक्ष सोहळा सासडवला पार पडणार असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित जगताप भाजपात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम १६ जुलै रोजी होणार असल्याची दाट शक्यता आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यात संजय जगताप यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवकही पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षाची वाट अत्यंत खडतर भाजप पुण्यासह संपूर्ण जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढवताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. यानंतर पुरंदरमधील संजय जगतापही त्याच वाटेवरती आहेत. या दोन्ही माजी आमदारांअगोदर पुण्यातील माजी आमदार यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केलेला आहे. या संपूर्ण घडामोडी पाहात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाची वाट अत्यंत खडतर होणार आहे. संजय जगताप कोण आहेत? संजय जगताप हे पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच मोठं नाव आहे. कायम काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ अशी त्यांची ओळख राहिलेली आहे. महायुती सरकारची सत्ता असताना पुरंतर तालुक्यातील रखडलेल्या कामांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे. जनसामान्यांचा नेता अशी ओळख त्यांची जनमानसांत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी अगोदर संजय जगताप निवडणुका लढविल्या, मात्र त्यांच्या वाटेला कायम पराभव आला. २०१९ ची विधानसभेची निवडणूक त्यांना विजयी मिळवून देणारी ठरली. पण २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा शिवतारेंनी पराभवाची धूळ चारली. हेही वाचा : दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता