दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Delhi Building Collapses | दिल्लीतील वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते, त्यापैकी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अजूनही ५ ते ६ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. हा परिसर खूप दाट लोकवस्तीचा आणि अरुंद रस्ते असल्याने बचावकार्यासाठी अवघड ठरत आहे.
#WATCH दिल्ली: सीलमपुर में एक ग्राउंड-प्लस-3 इमारत गिरने के बाद स्थानीय लोग मलबा हटाने में मदद कर रहे हैं। 3-4 लोगों को अस्पताल ले जाया गया है और लोगों के फंसे होने की आशंका है। pic.twitter.com/7kEkzLiMzV
— ANI_HindiNews (@AHindinews) July 12, 2025
सध्या घटनास्थळी ७ अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत आणि स्थानिक पोलीस आणि टीम ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत खूपच जीर्ण असल्याचं म्हटलं जात आहे. या इमारतीत दोन कुटुंबे राहत होती. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात आले आहे आणि अद्याप काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. तसेच या दुर्घटनेमागेचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही. Delhi Building Collapses |
हेही वाचा:





