Congress | Shinde Group: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका ! ‘हे’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

Congress | Shinde Group – विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.त्याच बरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. अशा काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोघे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी आज सकाळीच वर्षा या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत ज्या काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटींग केली होती, त्यांच्यात या दोघांचाही समावेश होता, असा आरोप आहे.
विधानसभेच्या तोंडावर या दोघांवर कारावईचीही शक्यता आहे. त्याबाबतची शिफारसही पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष कारवाई करण्या आधीच स्वत: पक्ष सोडण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. त्यामुळेच या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.





