Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे . ३० मे पासून ते अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याअगोदर अंतरवालीत एक मोठी घडामोड घडली आहे. भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. मात्र, मराठा समाजाच्या १० प्रमुख मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आग्रही आहेत. Maratha Reservation दरम्यान, मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे लाड यांनी जाहीर केले आहे. मला युद्ध पेटवायचे नाही तर… (Maratha Reservation) “दादांच्या ७ ते ८ प्रमुख मागण्या आहेत, त्या मी सविस्तर समजून घेणार आहे. आरक्षणाचा हत्ती गेला असून आता फक्त शेपूट राहिले आहे. या मागण्या घेऊन मी मंत्रिमंडळ उपसमिती आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करेन. मी अनेक महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन आलो आहे. यापुढे जरांगे पाटील यांना आंदोलन करावे लागणार नाही, याच भावनेतून मी काम करेन. मी भगवद्गीतेतील सार घेऊन आलो असून, मला युद्ध पेटवायचे नाही तर समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. manoj jarange and prasad lad यावेळी मनोज जरांंगेंनी प्रसाद लाड यांना काही सवाल केले. 58 लाख नोंदींचे काय झाले सांगा. नोंदी सापडून तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाहीत? असा जाब प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंनी विचारला. तसेच 29 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. याशिवाय मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, यासंह १० प्रमुख मागण्या त्यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. नेमक्या कोणत्या आहेत १० मागण्या? (Maratha Reservation) 1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या. 2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा. 3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा. 6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा. हेही वाचा : Chandrapur : भयानक घटना! दबा धरून बसलेल्या वाघाचा 13 जणांवर हल्ला; 4 महिलांचा जागीच मृत्यू़