आजी नव्हे, आता पत्नी.! प्रेमाच्या नशेत उचललं अजब पाऊल; 21 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आजीशी केलं लग्न

हरियाणा : हरियाणातील एका गावात 21 वर्षीय तरुणाने आपल्या 66 वर्षीय आजीशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनपेक्षित आणि समाजाच्या परंपरांना छेद देणाऱ्या नात्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडवली असून, सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. या प्रकरणाने सामाजिक नियम आणि नातेसंबंधांच्या व्याख्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इरफान (वय 21) याने आपली आजी सुलताना खातून (वय 66) यांच्याशी निकाह केला. सुलताना यांच्या पतीच्या निधनानंतर इरफान आपल्या आजीची काळजी घेत होता. या कठीण काळात इरफानने सुलताना यांना आधार दिला, ज्यामुळे दोघांमधील बंध अधिक दृढ झाले. हळूहळू त्यांच्यातील नाते केवळ कौटुंबिक न राहता भावनिक आणि प्रेमळ बनले. या भावनिक जवळीकीने अखेरीस विवाहाचे रूप घेतले.
या लग्नाला गावकरी आणि नातेवाइकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सामाजिक नियमांचा भंग आणि वयातील प्रचंड अंतर यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी या नात्याला अनैतिक ठरवले, तर काहींनी याला कौटुंबिक मूल्यांचा अवमान मानले. तरीही इरफान आणि सुलताना आपल्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी समाजाच्या टीकेकडे दुर्लक्ष करत आपल्या नात्याला औपचारिक स्वरूप दिले आहे.
सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाले असून, याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या नात्याला प्रेमाचे अनोखे उदाहरण मानले, तर काहींनी याला सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य ठरवले. आजकाल विवाहाशी संबंधित अशा चित्रविचित्र घटना सातत्याने समोर येत असून, यामध्ये सासू-जावई, दीर-वहिनी यांसारख्या नात्यांनंतर आता आजी-सुनाव यांच्या लग्नाची भर पडली आहे. हे प्रकरण हरियाणातील सामाजिक आणि कौटुंबिक चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे.





