Gargi Kulkarni : 17 वर्षांचा संसार मोडला… अन् नागराजअण्णाच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एन्ट्री; खास आहे ही लव्हस्टोरी!
Gargi Kulkarni : अनेक वर्षे पडद्यामागे राहून नागराज यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या चित्रपटात निर्माती आणि सर्जनशील सहकारी म्हणून गार्गी कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत.

Gargi Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित ‘खाशाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून नागराज यांच्या ‘खाशाबा’जी मोठी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मात्र, या चित्रपटाची आणखी एक खास बाब समोर आली आहे. ती म्हणजे नागराज यांची पत्नी आणि निर्माती गार्गी कुलकर्णी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे गार्गी कुलकर्णी नेमक्या आहेत तरी कोण? याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.
अनेक वर्षे पडद्यामागे राहून नागराज यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या चित्रपटात निर्माती आणि सर्जनशील सहकारी म्हणून गार्गी कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत. आता त्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे ‘खाशाबा’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा : Mithila Palkar: ‘‘नाही’ म्हणजे नाहीच! लैंगिक शिक्षणावर बोलणं ही मोठी जबाबदारी; मिथिला पालकरचं स्पष्ट मत’
१७ वर्षांचा संसार आणि…
नागराज मंजुळे चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर त्यांचं जीवन अत्यंत हलाकीत गेलं. त्यांनी याविषयी मुलाखतीत सांगितलं आहे. नागराज यांचं पहिलं लग्न १७ मे १९९७ या दिवशी सुनिता यांच्यासोबत झालं होतं. त्यावेळी ते बारावीत शिक्षण घेत होते. कुटुंबाच्या इच्छेनुसार झालेले हे लग्न १७ वर्षे टिकलं. मतभेदांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. ज्यावेळी नागराज यांचा सैराट हा चित्रपट रिलीज झाला, त्यावेळी घटस्फोट घेतलेल्या पत्नीने अनेक मोठे दावे केले होते.
ती माझ्यासाठी आरशासारखी आहे
नागराज यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर ते चित्रपटसृष्टीत रमले. नागराज यांच्या आयुष्यात गार्गी कुलकर्णी यांची एन्ट्री झाली. एका मुलाखतीत नागराज यांनी गार्गी यांच्याविषयी बोलताना सांगितले होते की, अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) येथे त्यांची पहिली भेट झाली. गार्गी यांना वाचन आणि साहित्याची विशेष आवड असून त्या स्वतः कविता लिहितात. त्यामुळे प्रत्येक नवीन कथा किंवा पटकथा लिहिल्यानंतर त्या सर्वप्रथम गार्गी यांना ऐकवतात.
नागराज यांच्या मते, गार्गी यांची प्रतिक्रिया आणि सर्जनशील दृष्टी त्यांच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाची असते. “ती माझ्यासाठी आरशासारखी आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या सर्जनशील प्रक्रियेत तिचा मोठा वाटा असतो,” असे त्यांनी एका मुलाखतीत नागराजने सांगितले होते.
यशस्वी निर्मात्या
फँड्री’पासून दोघांचे व्यावसायिक नाते अधिक दृढ झाले. निर्माती म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गार्गी यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची धुरा सांभाळली आहे. आता ‘खाशाबा’च्या माध्यमातून त्या पहिल्यांदाच अभिनयातही झळकणार असल्याने ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गार्गी या मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी निर्मात्या असून ‘सैराट’, ‘झुंड’ आणि ‘घर बंदूक बिर्याणी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
हेही वाचा : Ketan Aggarwal Case : सिया-चेतनचा ‘कोडवर्ड’ गेम उघड! मोबाईलमधील डिलिट डेटा ठरणार महत्त्वाचा पुरावा?





