भारतीय हवाई दलाचा 87 वा वर्धापनदिन

हवाई दलाने प्रात्यक्षिकांमधून दाखवली ताकद
विंग कमांडर अभिनंदन वर्धनाम यांची मिग-21 मधून भरारी
नवी दिल्ली : आज 8 ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. 87 वर्षांपूर्वी 1932 साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या 87 व्या वर्धापनदिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन एअरबेसमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, हवाई दलाचे जवान लढाऊ विमानांसोबत कसरती करताना दिसत आहेत.
Air Force Chief: Indian Air Force is grateful for nation’s trust&confidence in us & the support provided. On behalf of all air warriors, I assure the nation of our sacred resolve, defending the sovereignty of our skies&safeguarding our national interest at all cost. #AirForceDay pic.twitter.com/v3nU3JfLNb
— ANI (@ANI) October 8, 2019
हिंडन एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या एअर शोमध्ये प्रथमच फाइटर हेलिकॉप्टर अपाचे आणि हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर चिनूक आपली ताकद दाखवत आहेत. तसेच भारतीय हवाई दलाने प्रात्यक्षिकांमधून आपली ताकद दाखवली. तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 मधून भरारी घेतली. तत्पूर्वी, सैन्य प्रमुख बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरके सिंह भदोरिया आणि नौदल प्रमुख करंबीर सिंह शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय युद्ध स्मारकात पोहोचले होते.
#WATCH Ghaziabad: Wing Commander #AbhinandanVarthaman leads a ‘MiG formation’ and flies a MiG Bison Aircraft at Hindon Air Base on #AirForceDay today. pic.twitter.com/bRpgW7MUxu
— ANI UP (@ANINewsUP) October 8, 2019
दरम्यान, एअर चीफ मार्शल एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हवाई दल दिनी म्हणाले, बालाकोटचा प्रसंग हा दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी उदाहरण म्हणून योग्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित सरकारच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे त्यामुळे शेजारील राष्ट्रांना हा चिंतेचा विषय बनले आहे.
#WATCH Ghaziabad: Three Chinook transport helicopters fly in ‘Chinook formation’ at Hindon Air Base during the event on #AirForceDay today. pic.twitter.com/06rSyjvWv7
— ANI UP (@ANINewsUP) October 8, 2019
पुलवामा हल्ला संरक्षण आस्थापनांसाठी सतत धोक्याची आठवण करून देणारा आहे त्यामुळे दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सदैव तत्पर असणार आहे.
Indian Air Force (IAF) celebrates 87th anniversary on #AirForceDay2019 at Hindon Air Base in Ghaziabad. Army Chief General Bipin Rawat and IAF Chief, Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria present at the event. pic.twitter.com/w6GQLTJlKB
— ANI UP (@ANINewsUP) October 8, 2019
भदोरिया पुढे म्हणाले की, आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वातावरण हे चिंतेचे गंभीर कारण आहे. तसेच पुलवामा हल्ला देशावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची आम्हाला सतत आठवण करून देणारा हल्ला असल्याचे भदोरिया यांनी म्हटले आहे.




