पुणे | मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचारासाठी ७३ कोटींचा निधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
योजनेचा व्यापक प्रचार करण्यासाठी आराखड्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडुन मंजूर करण्यात आला आहे.
अतिरिक्त माध्यम आराखडा तयार करण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास कळविण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने योजनेच्या प्रचाराबाबतचा प्रस्तावास माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
अतिरिक्त माध्यम आराखडा योग्य रितीने अंमलात आणला जाईल, याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची आहे. खर्चाची बिले कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सचिवांकडे सादर करावी लागतील.




