वाई – वाई अर्बन बॅंकेच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 15 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 72 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाबळेश्वरचे सहाय्यक निबंधक जनार्दन शिंदे यांनी दिली.
बॅंकेची निवडणूक प्रक्रिया दि. 22 पासून सुरू झाली असून, शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वसाधारण गटामध्ये दहा, महिला राखीवमध्ये दोन, अनुसूचित जातीजमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग प्रत्येकी एक जागा आहे. गेल्या पाच दिवसांत 72 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष, सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, डॉ. शेखर कांबळे, अनिल देव, राजगोपाल द्रविड, माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे, विवेक पटवर्धन, माजी संचालक माधव कान्हेरे,
काशिनाथ शेलार, सचिन गांधी, प्रशांत नागपूरकर, रमेश ओसवाल, दत्तात्रय मर्ढेकर, नंदकुमार ढगे, बाळकृष्ण पंडित, मकरंद एरंडे, अशोक लोखंडे, स्वप्निल भिलारे, अनिल सावंत, पराग खोपडे, स्वप्निल जाधव, प्रवीण जगताप, यशवंत जमदाडे, दिलीप जमदाडे, मकरंद मुळ्ये, रवींद्र मेंहदळे, यशवंत लेले, प्रदीप चोरगे, अविनाश मेढेकर, अनिल शेंडे, ऍड. महेश राजेमहाडिक, अमित द्रविड, नरेंद्र गांधी, मनोज ओसवाल, दीपक हजारे, उमेश शहा, प्रमोद धाडीवाल, संजय धरमसी, विकास पिसाळ, संदीप खामकर, राखीव प्रवर्गातून सुधाकर वाईकर, अविनाश फरांदे, चंद्रशेखर ढवण, अतुल वाईकर, प्रीतम भूतकर, यशवंत जमदाडे, अरविंद आदलिंगे, अमर जमदाडे, चंद्रकांत गुजर, राजू खरात, गणेश जाधव, संतोष जाधव, महिला राखीव प्रवर्गातून अनुजा पटवर्धन, ज्योती गांधी, सुनीति गोवित्रीकर, सरिता जमदाडे, धनश्री ननावरे यांनी अर्ज दाखल केले आहे.
अर्जांची छाननी सोमवार, दि. 29 रोजी होणार असून, अर्ज माघारीसाठी 13 जूनपर्यंत मुदत आहे. चिन्हवाटप दि. 14 जून रोजी होणार असून, आवश्यकता असल्यास 25 जून रोजी मतदान आणि 27 जूनला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असे जनार्दन शिंदे यांनी सांगितले.