गोदावरीत बोट उलटली; 27 बचावले 37 बेपत्ता

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात बोट उलटून 50 जण बुडाले. या खासगी प्रवासी बोटीवर 61 प्रवाशी होते. त्यापैकी 14 जणांना वाचविण्यात यश आले. यात 11 जण मरण पावले असून बोटीवरील 10 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांच्या निकटवर्तीयांना 10 लाख रूपये मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

घटनास्थळावर पूर्व आणि पश्‍चिम गोदावरी जिल्ह्याचे अधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) पथके आणि पोलिस घटनास्थळावर रवाना झाली आहेत. या बोटीत जीवरक्षक जाकीट घातलेल्या 14 जणांना हा अपघात पाहणाऱ्या ग्रामस्थांनी वाचविले आहे.

सेनिक पर्पहिलला जाणसाठी ही बोट कटचुलूक गावातून निघाली. त्यानंतर तासाभरात ही दूर्घटना घडली. काही ग्रामस्थांनी बोट बुडताना पाहिली. त्यांनी 14 जणांना वाचवून दोन मृतदेह काठावर आणले. बचाव कार्यासाठी आंध्रप्रदेश पर्यटन महामंडळाच्या दोन बोटी आणि एक हेलीकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून नदी दुथडी बरून वहात असताना काकीनाडा बंदर अधिकाऱ्यांनी या बोटीला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलीच कशी? असा सवाल करण्यात येत आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश पूर्व गोदावरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री वायएसआर जगमोहन रेड्डी यांनीही या दूर्घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन पर्यटनमंत्री अवंती श्रीनिवास यांना घटनास्थळी रवाना करून मदत कार्यावर देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)