Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

Ratnagiri Road Accident : रत्नागिरी जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदीच्या पुलावर पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई-गोवा महामार्गावर पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.
या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती 100 ते 150 फूट खाली कोसळून कार जोरात खाली आदळली.
या घटनेत कारचा चेंदामेंदा झाला असून कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.




