बिहारमध्ये विषारी दारूने 5 जणांचा मृत्यू
Updated On:

नालंदा – बिहारमधील नालंदामध्ये विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या सर्वांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाल्याचा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशन परिसरातील छोटी टेकडी आणि तल्ली मोहल्लाचे हे सर्वजण रहिवाशी आहेत. या सर्वांनी मद्यप्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंद केला. त्याचवेळी मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगाव गावात दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.





