Accident: पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात; ५ ठार तर, ४२ गंभीर जखमी

Accident | Warkari Bus : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने किमान पाच जण ठार तर ४२ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही बस ५४ ‘वारकऱ्यांना’ घेऊन जात होती, जे मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून आषाढी एकादशीच्या उत्सवासाठी पंढरपूरला जात होते.
नवी मुंबईतील पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक्स्प्रेस हायवेवर असताना भरधाव वेगात असलेल्या बसने ट्रॅक्टरला धडक दिली. बसमधील तीन आणि ट्रॅक्टरमधील दोन प्रवासी ठार झाले, डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
ट्रॅक्टरला धडकल्यानंतर बस एक्स्प्रेस हायवेच्या बॅरिकेडमध्ये घुसली आणि २० फूट खोल दरीत कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी यात्रेकरूंना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.





