Chemical plant explosion : चीनमधील रसायनांच्या फॅक्टरीत स्फोट; 5 ठार तर 8 बेपत्ता

बीजिंग – उत्तर चीनमधील एका रसायनांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात किमान 5 जण ठार आणि 8 जण बेपत्ता झाले आहेत. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजधानी बीजिंगच्या पूर्वेकडील लायोनिंग प्रांतातल्या पंजीन क्षेत्रात रविवारी झालेल्या या स्फोटात अन्य किमान 30 जण जखमी झाले आहेत.
या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे फोटो स्थानिक वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. रसायनांच्या साठ्याला लागलेल्या आगीमुळे या फॅक्टरीच्या परिसरात काळा धूर भरून राहिला होता. या आगीमुळे आणि धुरामुळे पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण विभागाने या ठिकाणाला भेट दिली, असे पानशान क्षेत्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/melbourne-another-hindu-temple-vandalised-by-khalistan-supporters-in-australia/
ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास केला जातो आहे. या ठिकाणी मोठा स्फोट झाल्याचे सोशल मीडियावर पसरलेल्या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. मात्र या स्फोटामुळे या रसायनांच्या फॅक्टरीबाहेर कोहीही नुकसान झाले नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/uganda-turns-away-from-belt-and-road-rail-deal-as-china-stalls-on-loans/
चीनमध्ये औद्योगिक अपघातांचे प्रमाण खूप जास्त असते. 2015 साली तियान्जिन प्रांतातल्या असाच रसायनांच्या गोदामात झालेल्या स्फोटात 173 जण मरण पावले होते. यामध्ये आग विझवण्यास गेलेल्या फायर फायटर्सची आणि पोलिसांची संख्याच जास्त होती. लाच घेऊन सुरक्षिततेच्या उपाय योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यावेळी केला गेला होता.





