46 वर्षांपूर्वी प्रभात : मंगळावर उणे 122 अंश फॅदम तापमान….

मंगळावर उणे 122 अंश फॅदम तापमान
पॅसाडेना (कॅलिफोर्निया), दि. 22 – मंगळावर शून्याखाली 122 अंश फॅरनहाइट इतके तापमान असल्याचे ‘हायकिंग’ अंतराळयानाने मिळविलेल्या माहितीवरून दिसून आले आहे. या माहितीत पुढे म्हटले आहे, की तेथे आकाशाचा रंग निळा नसून गुलाबी आहे. मंगळावर यान उतरल्यानंतर अद्याप त्यातील भूंकपमापन यंत्र (सेस्मॉमीटर) काम देत नाही, असे आढळून आले आहे. पृथ्वीवरून तेथे रेडिओ संदेशांच्या साहाय्याने संपर्क प्रस्थापित केल्याशिवाय ते काम सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले. मंगळावर रात्रीच्या वेळी पूर्वेकडून नैऋत्येकडे सौम्य वारे वाहात असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रदूषण प्रतिबंधासाठी लवकरच विधेयक मांडणार
मुंबई – हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्याची तरतूद करणारे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येईल, असे महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
शहरांत गुरे बाळगण्यावर निर्बंध येणार
शहरी भागात गुरे बाळगण्याचे नियमन करणारे वा त्यास मनाई करण्याची तरतूद असणारे एक विधेयक बृहन्मुंबईत व परिसरात अंमलात आणण्यात येईल. हा कायदा अंमलात आल्यानंतर गुरे बाळगण्यासाठी दोन प्रकारचे परवाने देण्यात येतील. परवान्याशिवाय गुरे बाळगण्यास बंदी करण्यात येईल.
सातारा पालिकेला इशाराआलिशान मोटार गाडी विकत घेऊन सातारा नगरपालिकेने संबंधित मर्यादा ओलांडली आहे. पालिकेची ही कृती नियमबाह्य आहे.

