मिनी बसच्या अपघातात ४ खेळाडूंचा जागीच मृत्यू
Updated On:

अमरावती – यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंच्या ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात ४ खेळाडूंचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर दहा जण जखमी झाले. नांदगाव खंडेश्वर मार्गे यवतमाळला जात असताना हा अपघात घडला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातून हे खेळाडू स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यात निघाले होते. मात्र, स्पर्धेपूर्वीच या खेळाडूंवर काळाने घाला घातला. या अपघातातील मृतांच्या नावांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.





