4 कोटींचे सोन,28 आयफोन,15 प्रो मॅक्स मोबाइल जप्त ! गोव्यात डीआरआयची मोठी कारवाई

नवी दिल्ली – ड्रग्जसह सोने तरस्करीचा (gold taskari) भांडाफोड करणाऱ्या कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जात असताना महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने (DRI) सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे 5.7 किलो सोने आणि 28 आयफोन-15 प्रो मॅक्स मोबाइल बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली.
या कारवाईबाबत डीआरआयने (dri in gold) सांगितले की, अबू धाबी येथून सोन्याची पेस्ट घेऊन प्रवास करणारे आरोपी मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा भाग आहेत. 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबई ते अबुधाबी असा प्रवासही केला होता.
डीआरआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील इरफान (30), मुंबईचा रहिवासी कामरान अहमद (38) आणि गुजरातमधील मोहम्मद इरफान गुलाम (37) यांना डीआरआयने उत्तर गोव्यातून अटक केली.
आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची अंग झडती घेतली असता तिघांकडून पेस्टच्या स्वरूपात 5.7 किलो सोने आणि 28 आयफोन-15 प्रो मॅक्स मोबाइल फोन जप्त केले. ज्यांची एकूण किंमत 3.92 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी दुबईहून मुंबईत सोने आणि महागड्या वस्तूंची तस्करी करणाऱ्या टोळीचा भाग आहेत.





