पणजी :- येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या रणजित चव्हाणने वेटलिफ्टिंगमधील पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १२१ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २८१ किलो वजन उचलले.
तामिळनाडूच्या एन अजितने सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये १३० किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २९० किलो वजन उचलले. आंध्र प्रदेशचा खेळाडू जे कोटेश्वर राव कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्नॅचमध्ये १२५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५४ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले.
National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉलला वगळले, समोर आलं ‘हे’ कारण…
दरम्यान, काल महाराष्ट्राच्या दिपाली गुरसाळेने महिलांच्या ४५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते तर मुकुंद आहेरने पुरुषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले होते.