34th Sub Jr. National Kho Kho C’ship 2024 : महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक…

34th Sub Junior National Kho Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना ३४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. झारखंड खो-खो संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत किशोर संघाने त्रिपुरावर एक डाव व ३६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला.
त्यानंतरच्या लढतीत विदर्भ संघाला एक डाव व २८ गुणांनी पराभूत केले. महाराष्ट्राच्या श्री दळवीने ३.०० मिनिट संरक्षण करत २ गडी बाद करीत अष्टपैलू खेळ केला. सुरेश वसावेने २.१० मी., २.३० मी. संरक्षण केले. भीमसेन वसावेने अष्टपैलू खेळ करताना नाबाद १.५० मी. संरक्षण करीत २ गडी बाद केले. सुरेश चव्हाणने ४ गडी टिपले.
किशोरी गटात महाराष्ट्राने तेलंगणा, दिल्ली, सिक्कीम आणि त्रिपुरावर दणदणीत विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले. साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्रच्या मुलींनी तेलंगणावर १ डाव आणि ४ गुणांनी विजय नोंदवला. सिद्धी तामखडेने दोन्ही डावात ४.१० मी. आणि ४.०० मी. संरक्षण करताना १ गडी बाद केला. तिच्या या अष्टपैलू खेळामुळे महाराष्ट्राचा विजय अगदी सोपा झाला. तिला सिद्धी भोसले १.३० मी., वेदिका तामखडे २.१० मी संरक्षणाची तर अपूर्वा वर्दे आणि प्रणिती जगदाळे प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ मिळाली.
IND vs BAN 2nd Test : कोहलीनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम, 35 धावा करताच रचला इतिहास….
उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने
किशोर गट : महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश
किशोरी गट : महाराष्ट्र विरुद्ध गुजरात.





