Shikrapur News : शिरुर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर
Shikrapur News : माननीय उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही 'समान काम समान वेतन' लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

Shikrapur News : मा. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा व तालुका न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान काम समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असताना शिरूर येथील न्यायालयातील ७६ कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. (Shikrapur News)
घोडनदी – शिरूर येथील न्यायालयातील ७६ कर्मचारी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या समान काम समान वेतन या मागणीच्या संपात सहभाग घेत काम बंद ठेवले असून शिरुर न्यायालयातील कर्मचारी आजपासून त्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. (Shikrapur News)
मा. उच्च न्यायालयाने या वेतनवाढीच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली, मात्र हा प्रस्ताव मागील २२ महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे. शासनाच्या या दिरंगाई विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमधील ३४,००० कर्मचारी आजपासून संपावर उतरले आहेत. (Shikrapur News)
याप्रमाणेच शिरुर येथील मा. सत्र न्यायालय, मा. दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) आणि मा. सह दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) यांच्या आस्थापनेवरील सर्व ७६ कर्मचाऱ्यांनी आजपासून कामावर बहिष्कार टाकत बेमुदत आंदोलन सुरू केल्याने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे न्यायालयीन दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. (Shikrapur News)
या आंदोलनात शिरूर न्यायालयातील लघुलेखक श एस. एन. पाटील, लिपिक जी. एस. जोशी, मुख्य बेलिफ एस. डी. मोडक, शिपाई जे. डी. वाघमोडे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी सुहास नेवासकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. (Shikrapur News)
जोपर्यंत शासन २२ महिन्यांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रस्ताव मान्य करत नाही, तोपर्यंत हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Shikrapur News)
Shikrapur News : कोंढापुरीत गरबा पाहायला गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; अवघ्या २४ तासांत ३ जण गजाआड





