Indurikar Maharaj : ‘मुली मुलांवर नाही, पैशांवर प्रेम करतात’; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची चर्चा
Indurikar Maharaj : आपल्या रोखठोक शैलीत सामाजिक, कौटुंबिक आणि समकालीन विषयांवर भाष्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून सामाजिक, कौटुंबिक आणि विविध समकालीन विषयांवर भाष्य करत असतात. त्यांच्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा होते, तर काही विधानांमुळे वादही निर्माण होतात. आता मुलींच्या प्रेमाबाबत त्यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Indurikar Maharaj)
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाळीनिमित्त भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथे ‘दिवाळी वंडरलँड’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी उपस्थितांशी संवाद साधला. (Indurikar Maharaj)
यावेळी प्रेम या विषयावर बोलताना त्यांनी, “प्रेम वगैरे काही नसतं. मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या पैशांवर प्रेम करतात,” असे विधान केले. इंदुरीकर महाराज यांच्या या विधानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रेम आणि नातेसंबंधांबाबत केलेल्या या विधानामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. (Indurikar Maharaj)





