महिन्याला 3.5 लाख…तर एक दिवसाला घेतात तब्बल ‘इतके’ रुपये; बाबा बागेश्वर आहेत इतक्या कोटींचे मालक !

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे.
त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
आपल्या कडे येणाऱ्या भाविकांचं मन वाचन करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री एका आठवड्याला आणि महिन्याला किती कमाई करतात हे माहिती आहे का? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा बागेश्वर हे तब्बल 19.50 कोटींचे मालक आहेत. त्यांच्या दिव्य दरबारात भाविक मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात. बाबाची एक कथा जवळपास 15 दिवस चालते. त्यासाठी ते एक ते दीड लाख रुपये घेतात.
तर, बाबा बागेश्वर दर महिन्याला 3.5 लाख रुपये सहज कमाई करतात. तर रोज जवळपास आठ हजार रुपये कमाई करतात. तर, दुसरीकडे अनेक लोक त्यांच्या दरबारात दानधर्म देखील मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत.





