राज्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election| लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज महाराष्ट्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी मतदानासाठी दोन ते तीन तास लागत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. Maharashtra Lok Sabha Election|
नागरिकांना मतदान केंद्रावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत होत असल्याचे दिसत आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. 8 राज्यांच्या तुलनेत आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी Maharashtra Lok Sabha Election|
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के.
हेही वाचा:
देशात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान ; महाराष्ट्रात सर्वात कमी टक्केवारी





