chhattisgarh election : छत्तिसगढमधील 20 जागांसाठी 223 उमेदवार रिंगणात
Updated On:

chhattisgarh election – छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या (chhattisgarh election) 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होईल. त्या टप्प्यात एकूण 223 उमेदवार (candidate) रिंगणात आहेत. छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यासाठी दोन टप्प्यांत मतदान होईल.
पहिल्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 294 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 253 जणांचे अर्ज छाननीत वैध ठरले. सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
आता रिंगणात राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य सुमारे 41 लाख मतदार ठरवतील. पहिल्या टप्प्यात उमेदवार म्हणून काही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामध्ये भाजपचे नेते असणारे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष दिपक बैज यांचा समावेश आहे.





