कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत

Anushka Sen | कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहे. अभिनेत्री अनुष्का सेन 22 वर्षीय पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. तिने आपल्या खास लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
जांभळ्या रंगाच्या फ्लोरस गाऊनमध्ये अनुष्काने कान्स फिल्म फेस्टिव्हलला शाही अंदाजात हजेरी लावली. रेड कार्पेटमध्ये अनुष्काने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या. याशिवाय अनुष्काने रेड कार्पेटवर कोरिअल हार्ट इमोजी असलेलं साइन बनवत खास पोज दिली. कमी वयात मिळवलेल्या तिच्या मोठ्या यशाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
टीव्ही इंडस्ट्रीपासून अनुष्काने अभिनय प्रवासाला सुरुवात केली. अनुष्काने क्रिएटिव एनर्जी, ग्लोबल फॅन फॉलोइंग आणि विविध प्लॅटफॉर्म्सवर यशस्वी वाटचाल केली आहे. दिल, दोस्ती, डिलेमा या वेबसीरिजमध्ये साकारलेल्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. अनुष्का सेनच्या ग्लॅमरस लूकने तिने तिच्या चाहत्यांची पसंती मिळवली आहे. ‘दिल दोस्ती डिलेमा’ आणि ‘किल दिल’ यांसारख्या वेबसीरिजमधील तिच्या प्रभावी अभिनयाने अनुष्काने केवळ ग्लॅमर नाही तर खरा अभिनय कौशल्यही सिद्ध केला आहे. Anushka Sen |
सध्या ती साउथ कोरियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतही मोठी छाप सोडत आहे. ती लवकरच ‘एशिया’ आणि त्याच्या स्पिन-ऑफ सिरीज ‘क्रश’ मध्ये कोरियन ऑलिम्पिक शूटर किम ये-जी च्या सोबत दिसणार आहे. यामुळे तिची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत होत आहे. Anushka Sen |
हेही वाचा:





