Israeli airstrike : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मध्ये गाझात २० ठार

देर अल-बलाह, (गाझा पट्टा) – मध्य गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात किमान २० लोक ठार झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुले आहेत. युद्धानंतर गाझाचे राज्य कोणी चालवावे यावरून इस्रायलच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे.
आता युद्धाच्या आठव्या महिन्यात रविवारी उत्तरेकडे नव्याने लढाई सुरू झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांच्याच युद्ध मंत्रिमंडळाकडून टीकेचा सामना करावा लागतो आहे.
त्याचा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी, बेनी गँट्झ यांनी ८ जूनपर्यंत युद्धानंतरच्या गाझासाठी आंतरराष्ट्रीय प्रशासनाचा समावेश असलेली योजना तयार केली नाही, तर सरकार सोडण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन रविवारी इस्त्रायलच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. यावेळी गाझाच्या युद्धानंतरच्या प्रशासनाच्या स्थापनेबाबत सौदी अरेबियाने सुचवलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.
मात्र नेतान्याहू यांनी पॅलेस्टिन देश म्हणून कोणत्याही प्रस्तावाला विरोध केला आहे. गाझाच्या सुरक्षेचे नियंत्रण इस्रायलकडेच राहिल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र उजव्या विचारसरणीच्या इस्रायली नेत्यांना गाझाला स्वतःचे सैन्य असावे, असे वाटते आहे.
मध्य गाझाली नुसेरत पॅलेस्टिनी शरणार्थी छावणीजवळ आज झालेल्या हवा हल्ल्यात किमान २० जण ठार झाले. नुसेरातमधील रस्त्यावर एका वेगळ्या हवाई हल्ल्यामध्ये आणखी पाच लोक ठार झाले, असे पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट आपत्कालीन सेवेने म्हटले आहे.
तर उत्तर गाझामध्ये अधिक हवाई हल्ले झाल्याचे पॅलेस्टिनींनी म्हटले आहे. हा भाग इस्रायली सैन्याने महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वेगळा पाडला असून तेथे सध्या दुष्काळ चालू आहे, असे जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे.





