Terrorist Attack : तोयबाच्या म्होरक्यासह २ दहशतवादी ठार
Updated On:

Terrorist Attack – जम्मू-काश्मीरमधील चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहतशतवाद्यांचा खात्मा केला. ते लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य होते. ठार झालेल्यांमध्ये रियाझ डार या तोयबाच्या म्होरक्याचाही समावेश आहे.
पुलवामा जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. संबंधित ठिकाणी सुरक्षा जवान पोहचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
त्याला सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यामध्ये रियाझ आणि त्याचा साथीदार रईस मारले गेले.
रियाझचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. दहशतवादाशी संबंधित विविध प्रकरणांत तो वॉन्टेड होता. मात्र, काही वर्षांपासून तो सुरक्षा दलांना चकवत होता.





