IMP NEWS | करोना लस स्लॉट मिळविण्यात 18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना ‘ही’ वेबसाइट करेल मदत !

28 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी करोना लसीची नोंदणी सुरू केली गेली आहे. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता लसीसाठी नोंदणी सुरू झाली, परंतु लाखो लोक एकाच वेळी एकत्रित झाल्यामुळे कोव्हिन पोर्टल क्रॅश झाले. मात्र नंतर करोडो लोक नोंदणी करण्यात यशस्वी झाले.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या काही लोकांनी नोंदणी तर केली आहे, परंतु त्यांना स्लॉट मिळत नाही, असेही दिसून येत आहे. लोकांची ही गरज पाहून, एक वेबसाइट सुरू केली गेली आहे जी स्लॉटबद्दल माहिती देत आहे. या वेबसाइटवर सर्व राज्यांविषयी माहिती आहे.
बर्टी थॉमस नावाच्या प्रोग्रामरने ‘अंडर फोर्टी फाईव्ह डॉट इन’ (under 45.in) नावाची एक वेबसाइट तयार केली आहे, जी 18 ते 45 वर्ष वयोगटातील लसी केंद्र आणि स्लॉट प्रदान करण्यात मदत करत आहे. ‘under 45.in’ ही अधिकृत वेबसाइट कोविनपेक्षा थोडी वेगळी आहे. फिल्टर्स नसल्याने सर्व वयोगटातील लोक कोविनला भेट देत आहेत.
‘under 45.in’ वर एक फिल्टर लावण्यात आला आहे, जेणेकरुन केवळ 18 ते 45 वयोगटातील लोकांनाच लस केंद्र व स्लॉटची माहिती मिळू शकेल. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, आपण प्रथम आपले राज्य निवडा आणि नंतर जिल्हा निवडा आणि स्लॉट पहा. आपण पिन कोडच्या मदतीने स्लॉटबद्दल देखील माहिती मिळवू शकता.
सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लस नोंदणी सुरू केली असून 1 मेपासून लसीकरण सुरू असल्याची चर्चा आहे, परंतु बर्याच राज्य सरकारांनी यास नकार दिला आहे. राज्य सरकारांचे म्हणणे आहे की लस नसल्यामुळे सध्या 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना लसी दिली जाणार नाही. असे असले तरी तामिळनाडू सरकारने 18-45 वयोगटातील मर्यादित संख्येसाठी लसी लागू करण्याची घोषणा केली आहे.





