Pakistan : पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीची 18 हजार प्रकरणे प्रलंबित; सदोष न्यायव्यवस्थेचा परिणाम

Pakistan – पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुन्हेगारी (crime) स्वरुपाच तब्बल 18 हजार प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.. या प्रकरणांमधील संशयित अजूनही मोकाट फिरत आहे.
पाकिस्तानमधील सदोष न्यायव्यवस्था, तपासातील दिरंगाई आणि कालबाह्य झालेल्या कायद्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणाऱ्या एका आगाडीच्या दैनिकाने केली आहे.
न्यायालयाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इस्लामाबादच्या पश्चिम सत्र विभागात 9369 फौजदारी खटले प्रलंबित आहेत. तर पूर्व सत्र विभागात एकूण 8,660 प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय इस्लामाबादेतील एकूण प्रलंबित प्रकरणांची संख्या 18, 029 इतकी जास्त आहे.
2023 मध्ये, सत्र न्यायालयाने 1143 प्रकरणांमध्ये संशयितांना दोषी ठरवले, तथापि, मुख्यतः सत्र न्यायालयातील खटला कमकुवत होते त्यामुळे 661 प्रकरणांमध्ये अपीलीय मंचांद्वारे दोषींची निर्दोष मुक्तता झाली, निर्दोष मुक्त झालेल्या संशयितांमध्ये बलात्काराच्या आरोपातील संशयितांची संख्या खूप जास्त आहे. ही चिंता वाटावी, अशी गोष्ट आहे.
अशा 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये, सदोष तपास, कमकुवत खटला आणि न्यायालयाबाहेर केली जाणारी तडजोड यांमुळे संशयितांनी शिक्षा मिळू शकली नाही. तसेच कालबाह्य कायदे आणि तपासात जाणीवपूर्वक केलेली दिरंगाई यामुळेही प्रकरणे अनेक वर्षांपर्यंत प्रलंबित राहिली आहेत.
विशेषतः “हाय प्रोफाईल’ प्रकरणांमधील संशयितांना दोषी ठरवण्यात अपयश येत असल्याकडे पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालय आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही वारंवार लक्ष वेधले आहे.





