satara | जावली तालुक्यातील ४४ विकासकामांसाठी १७ कोटी ४१ लाख मंजूर

सातारा, (प्रतिनिधी) – कोयना प्रकल्पांतर्गत जावली तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुवधा करणे योजनेंतर्गत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ४४ विकासकामांसाठी तब्ब्ल १७ कोटी ४१ लाख ७१ हजार २७२ रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी महसूल व वन विभागाकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
जावली तालुक्यातील अंबवडे येथे कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. १ मध्ये) ७३,८६,६३० रुपये, कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण करणे (कि.मी. २ मध्ये) ७४,०९,९८१ रुपये, कळकोशी से अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण ७४,३३.३०४ रुपये, कळकोशी ते अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण ७४.५६,६४३ रुपये,
कळकोशी से अंबवडे पोहोच रस्त्यास खडीकरण व डांबरीकरण ८२,२२,९४३ रुपये, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे ८२५, ९४० रुपये, ४५,७७,९००, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे ७४.९८.७६९ रुपये , पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे ७०,११,०३२ रुपये, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे ७३,९९,४८४ रुपये, पोहोच रस्त्यास मोरी बांधकाम करणे ७,.३३,९९१ रुपये निधी मंजूर झाला आहे.
वाघळी येथील पोहोच रस्ते डांबरीकरण करणे ४५,७८,८४३ रुपये, पोहोच रस्ते डांबरीकरण करणे यासाठी ४५,८७,७५० रुपये, पोहोच रस्ते डांबरीकरण करणे यासाठी ४५,९६,६५४ रुपये निधी मंजूर झाला आहे. शेंबडी बु. येथील पोहोच रस्ते डांबरीकरण ७१,७१,२५० रुपये, अंतर्गत रस्ता सांधणीकरण काम करणे यासाठी ३९,६३,२६० रुपये, खुली गटारे बांधणे २०,५४,३४७ रुपये निधी मंजूर झाला.
निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधणे ३८,३२,७३२ रुपये निधी, आपटी (फुरूस) येथे मोरी बांधकाम व पोहोच रस्ता डांबरीकरण करणे ३२,१५,४६३ रुपये, अंबवडे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे ३८,७६,८५२ रुपये,
अंबवडे येथे शाळेभोवती संरक्षक भिंत बांधणे १३,२३,२३१ रुपये, वाकी येथे वाडी/वस्तीस अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे २१,१२,२०१ रुपये, वाकी अंतर्गत रस्ता करणे व सी. डी. वर्क बांधणे ४३,६३,९८६ रुपये, केळघर तर्फ सोळशी येथे अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे १२,६४,०१९ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बामणोली येथे स्मशानभूमी परिसर सुधारणा १५,००,००० रुपये, बामणोली स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ३२,००,००० रुपये, बामणोली ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे २०,००,००० रुपये, पावशेवाडी स्मशानभूमी परिसर सुधारणा १५,००,००० रुपये,
पावशेवाडी अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर बांधणे ५०,००,००० रुपये, म्हावशी स्मशानभूमी शेड बांधणे १०,००,००० रुपये, म्हावशी अंतर्गत्त रस्ते काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर बांधणे ५४,७७,००० रुपये, शेंबडी बु. स्मशानभूमी परिसर सुधारणा २०,००,००० रुपये, शेंबडी बु. अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण ४२,८६,००० रुपये,
शेंबडी खु. स्मशानभूमी परिसर सुधारणा २०,००,००० रुपये, शेंबडी खु.अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण३५,९९,००० रुपये, शेंबडी खु. मजरे शेंबडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे १०,००,००० रुपये, आपटी फुरूस येथे अंगणवाडी इमारत बांधणे ११,२५,००० रुपये, आपटी हात्रेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता करणे २८,००,००० रुपये, आपटी विठ्ठलवाडी येथे समाजमंदिर बांधणे २०,००,००० रुपये,
निपाणी ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे २०,००,००० रुपये, निपाणी गाव अंतर्गत कॉक्रीट गटर्स बांधणे २८,५१,००० रुपये, निपाणी अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण ११,००,००० रुपये, वाकी स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे ४५,००,००० रुपये, तेटली स्मशानभूमी शेड १०,६२,००० रुपये, तेटली स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणे ५०,००,००० रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.





