कराड : कराड पालिका निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी झाली. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्जांपैकी 17 अर्ज वैध आणि पाच अर्ज अवैध ठरले. नगरसेवकपदांसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून, अंतिम यादी बनविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कराड पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 22 आणि नगरसेवकपदांसाठी तब्बल 330 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रात झाली. आधी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केली. निवडणूक निरीक्षक ज्योती कावरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर (भाजप), झाकीर पठाण (काँग्रेस व अपक्ष), राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी व शिवसेना) अल्ताफ शिकलगार (अपक्ष), रणजित पाटील (अपक्ष), इम्रान मुल्ला (बसप), गणेश कापसे (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष), शरद देव (अपक्ष), बापू लांडगे (अपक्ष), अतुल शिंदे (भाजप) व किरण थोरवडे (बसप) यांचे अर्ज वैध ठरले. अल्ताफ शिकलगार, सुहास जगताप, रणजित पाटील (शिवसेना), राजेंद्र माने, इंद्रजित गुजर यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.