लीबियाजवळ बोट बुडून १६ पाक स्थलांतरितांचा मृत्यू

इस्लामाबाद : पाकिस्तानमधून लीबियामध्ये अवैधपणे स्थलांतर करणारे १६ जण बोट बुडाल्यामुळे बुडून मरण पावले आहेत. पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर अन्य १० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. लीबियाची राजधानी त्रिपोलीमधील पाक दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने झाविया शहरात जाऊन स्तानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेची माहीती घेतली.
दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये ६३प्रवासी होते आणि आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या पासपोर्टच्या आधारे हे सर्व पाकिस्तानी नागरिक असल्याचे नि,पन्न झाले आहे. आणखी १० पाकिस्तानी बेपत्ता झाले आहेत, असे परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे. / दुर्घटनेत ३७ जण बचावले असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर ३३ जण पोलिसांच्या कोठडीमद्ये आहेत. अन्य तिघे त्रिपोलीमध्ये पाक दूतावासाच्या आश्रयाला आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. लीबियाच्या झाविया शहराच्या वायव्येकडील मार्सा डेला बंदराजवळ ही बोट बुडाली. गेल्या महिन्यात मोरोक्कोजवळ देखील अशीच बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत ६६ पाक अवैध स्थलांतरितांचा बुडून मृत्यू झाला होता.





