Bangladesh Blast : बांगलादेशातील स्फोटात 16 ठार; किमान 100 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्यातील 7 मजली इमारतीमध्ये आज झालेल्या अतिभीषण स्फोटात किमान 16 जण ठार झाले, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटानंतर इमारतीला लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले होते. ही आग विझवण्यासाठी अनेक फायर फायटर घटनास्थळी दाखल झाले होते. या स्फोटाचे नेमके कारण त्वरित समजू शकले नाही.
या इमारतीच्या तळघरामध्ये अनेक लोक अडकलेले असल्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. स्फोटाचे कारण तपासण्यासाठी आणि संभाव्य स्फोटकांचा शोध घेऊन ती नष्ट करण्यासाठी बांगलादेशच्या “रॅपिड ऍक्शन बटालियन’चे पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे.
स्फोटातील जखमींना ढाका मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ढाका पोलीस दलाचे निरीक्षक बच्छू मियाह यांनी सांगितले. स्फोट झालेल्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bankrupt-pakistan-gets-another-1-3-billion-aid-from-all-weather-friend-china/
तसेच या इमारतीच्या शेजारच्याच इमारतीत ब्रॅक बॅंकेची एक शाखा देखील आहे. स्फोटामुळे या बॅंकेची काचेची तावदाने फुटली आणि रस्त्यावर विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या एका बसचेही मोठे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.




