पुणे जिल्हा | भाटघर प्रकल्पांग्रस्त गावांना १६ कोटींचा निधी मंजूर

भोर, (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील भाटघर धरण प्रकल्पांग्रस्त गावातील नागरिकांच्या विकास कामांसाठी सुमारे १६ कोटी ५७ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी शुक्रवार (दि. २०) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला असून धरणग्रस्त भागातील २६ गावातील नागरिकांना सेवा, सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे पाठपुरावा करून २० गावांना १६ कोटी ५७ लाख ८ हजार रुपये मंजूर करण्यात असून यामध्ये समागृह,
समाजमंदिर, अंतर्गत काँक्रीटीकरण, गटारे ही कामे या निधीतून प्राधान्याने केली जाणार आहेत. तसेच उर्वरित गावांना तत्काळ निधी मिळावा. यासाठी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे रणजीत शिवतरे यांनी सांगितले.
भाटघर धरणग्रस्त प्रकल्पांतर्गत निधी मंजूर झालेली गावे व कंसात मंजूर निधी. वाढाणे (५६ लाख ७७ हजार), कांबरे बु (९५ लाख ७८ हजार), भाड्रवली (४३ लाख), भूतोंडे (२२लाख ८० हजार), खुलशी (६७ लाख ९१ हजार), गृहिणी (४३ लाख), बोपे (९५ लाख २६ हजार),
चांगवणे (९८ लाख ७० हजार), कुंबळे (१ कोटी ६८ लाख), सांगवी हिमा (२ कोटी), येवली (५४ लाख ७३ हजार), बसरापूर (९ लाख ८४ हजार), बारे खुर्द (५१ लाख ८५ हजार), बारे बुद्रुक (२० लाख), म्हाळवडी (७५ लाख ५० हजार), पसुरे (९३ लाख २१ हजार), राजघर (१ कोटी) वेळवंड (८६ लाख ४३ हजार), कोंडगाव (७९ लाख ९२ हजार), सांगवी वे खो (८१ लाख ३१ हजार).




