UPI transactions: युपीआयद्वारे ऑक्टोबरमध्ये 16 अब्ज व्यवहार
Updated On:

नवी दिल्ली – युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे या वर्षी ऑक्टोबरमध्ये 16 अब्ज 58 कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमधे सुमारे 23 कोटी 49 लाख रुपयांची देवाण घेवाण झाली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात 45 टक्के वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं 2016 मध्ये ही सुविधा दाखल केली.
यात अनेक बँक खाती एकाच मोबाईल पमध्ये सामायिक करून डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहार करणं सहजशक्य झालं आहे. या पेमेंट इंटरफेस आंतरराष्ट्रीय पातळीवरही पसंती मिळाली असून संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस अशा सात देशांमध्येही ही सुविधा वापरली जात आहे.
टॅग्स:





