सातारा-जावळीतील 26 विकासकामांसाठी सव्वादोन कोटी

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा-जावळी मतदारसंघातील विविध प्रकारच्या 26 विकासकामांसाठी दोन कोटी 31 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या ‘ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे.
सातारा तालुक्यातील कुसवडे, मापरवाडी आणि डोळेगाव येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम (प्रत्येकी 15 लाख), लिंब येथे वडार वाडा समाजमंदिर ते रामेश्वर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, गोगावलेवाडीतील रस्ते सुधारणा, वेणेखोल येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण,
कोंडवे येथे मेढा रस्ता ते स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, कारी येथे जानाईदेवी मंदिर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण, हातगेघर येथे अण्णासाहेब पाटील चौक ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण (प्रत्येकी दहा लाख), कुरुळबाजी येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (आठ लाख रुपये) ही कामे मंजूर झाली आहेत.
जावळी तालुक्यातील गोटेघर येथे ग्रामपंचायत इमारत (15 लाख), वहागाव येथे ग्रामपंचायत इमारत (12 लाख), शिंदेवाडी येथे दत्तनगरातील रस्ते काँक्रिटीकरण, म्हाते खुर्द स्मशानभूमी रस्ता व शेड, सोमर्डी येथे स्मशानभूमी शेड (प्रत्येकी दहा लाख), कोळघर येथे स्मशानभूमी (आठ लाख), केळघर येथे लिंगायत स्मशानभूमी संरक्षक भिंत (सात लाख), आखाडे येथे स्मशानभूमी बांधकाम (सहा लाख),
बामणोली तर्फ कुडाळ गावठाणात बंदिस्त गटारे, फळणी येथे स्मशानभूमी शेड, महिगाव येथे स्मशानभूमीस वाढीव संरक्षक भिंत, विवर आणि कावडी येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण,
मोहाट येथे स्मशानभूमी, वालुथ येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण, आनेवाडी येथील स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी चबुतरा बांधणे व सोलिंग करणे ((प्रत्येकी पाच लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.
निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून, कामे तातडीने सुरू करा. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.





