रेल्वेने केली 139 या हेल्पलाईन क्रमांकाची सुरवात
Updated On:

नवी दिल्ली : प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने 139 या क्रमांकाची सुरवात केली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण केले जाणार आहे.
139 या क्रमांकावर बारा भाषात तक्रार करता येणार आहे. हा क्रमांक आयव्हीआरएस (इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) वर आधारित आहे. या नंबर लावण्यासाठी स्मार्टफोनची गरज नसेल. सर्वसाधारण मोबाईलवरून तक्रार नोंदवता येऊ शकते.





