पुणे जिल्हा : इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणार

खेड-आळंदीचे महायुतीचे उमेदवार मोहितेंचे आश्वासन
राजगुरुनगर – खेड तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणार. तर भामा आसखेड धरणाचे पाणी वाटप झाले, त्यावेळेला मी आमदार नव्हतो, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील. मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शिरोली येथे गाव भेट दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोहिते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद बुट्टेपाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक राम गावडे, गणेश सांडभोर, आरपीआयचे अध्यक्ष दिलीप नाईनवरे, शांताराम चव्हाण, नवनाथ होले, वैशाली जाधव, विशाल पोतले, सुनिल देवकर, सरपंच मुदिता देखणे, शिवाजी डावरे, दत्ता मांडेकर, संजय सावंत, चंद्रकांत सावंत, संजय देखणे, संतोष खरपासे, रविंद्र सावंत, जगन सावंत, हरेश देखणे, नारायण शिंदे, उज्वला शिंदे, हिरा वाळुंज, चैताली सावंत, दुर्गा लोखंडे, शुभांगी सावंत, जया दसगुडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले की, विरोधकांना माहित नसेल भामा आसखेड धरणाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या वेळेला नारायण पवार आमदार होते मी माझ्या स्वतःच्या कारने त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. भामा आसखेड धरणाचे पाणी वाटप ज्यावेळी झाले त्यावेळी मी आमदार नव्हतो.
भामा आसखेड धरणाचे पाणी वाटप 2014-19 या कालावधीत झाले. धरणाचे 100 टक्के पाणी वाटप करण्यात आले आहे. मी तालुक्यातील धरणे विकून टाकली नाहीत. या विरोधकांनी केलेल्या आरोपांना मोहिते पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. विरोधकांनी शिरूर तालुक्यात करंदी येथे 35 एकर जमीन कशाच्या जोरावर घेतली हे त्यांनी सांगावे, अशी खरमरीत टीका ही त्यांनी केली. प्रास्ताविक रवींद्र सावंत यांनी सूत्रसंचालन दत्ता वाळुंज यांनी तर संजय सावंत यांनी आभार मानले.
उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या कालच्या सभेची गर्दी पहिली तर आमदार मोहिते मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पुन्हा गरजणार आहे. तालुक्यांत अनेक नेत्यांच्या सभा झाल्या; पण कोणीही म्हटले नाही तुम्ही आमदार निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो. राज्यात अजित पवार यांच्या सारखा एकमेव नेता आहे. त्यांनी मोहितेंना मंत्री करण्याचा शब्द दिला आहे.
– शरद बुट्टे पाटील, अध्यक्ष, पुणे जिल्हा
सरपंचांनी दिले मानधन
शिरोलीच्या सरपंच मुदीता देखणे यांनी सरपंच पदाचे मिळणारे मानधन दिले आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवडणुक कार्यासाठी दिले.





