Pune District : होमिओपॅथीच्या डॉक्टरांची नोंदीची प्रक्रिया सुरू करावी
Updated On:

– घोडेगावच्या नायब तहसीलदारांना डाॅक्टरांचे निवेदन
मंचर – सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना न्याय मिळावा.या मागणीचे घोडेगाव येथील नायब तहसीलदार शांता असवले यांना निवेदन देण्यात आले,अशी माहिती डॉ. सुहास कहडणे यांनी दिली.
गेली १० वर्षे सरकारी एमबीबीएस महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेले ९१६० डॉक्टरांची नोंद एमएमसी परिषदेत होणे संबधी कायदा २०१४ रोजी विधानसभेत झाला असताना अजूनपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी होणार होती.
पण शुक्रवार, दि.११ रोजी परिपत्रक काढून या नोंदी थांबविण्यात आल्या. तरी या नोंदीची प्रक्रिया त्वरित सरकारने करावी,अशी मागणी आंबेगाव तालुका होमिओपॅथीक डॉक्टरांकडून करण्यात आली.यावेळी डॉ. सुहास कहडणे, राजश्री कोल्हे, वर्षा थोरात, प्रवीण पोखरकर उपस्थित होते.





