पुणे जिल्हा | छत्रपती माध्यमिक सेवकांच्या पतसंस्थेकडून 13 टक्के लाभांश

भवानीनगर, (वार्ताहर)- श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. यावेळी सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
रविवारी (दि. 14) सकाळी दहा वाजता श्री छत्रपती माध्यमिक उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रमेश मचाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेपुढे एकूण नऊ विषय घेण्यात आले होते.
या नऊही विषयावरती साधक-बाधक चर्चा होऊन हे सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीमधील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याचबरोबर सेवानिवृत्त झालेले शिक्षक मुख्याध्यापक यांचा देखील शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मचाले प्रास्ताविकात म्हणाले, संस्थेला आज 49 वर्ष पूर्ण होत आहेत.
आजपर्यंत या पतसंस्थेचा आर्थिक अहवाला हा चढत्या क्रमांकाचा असून इथून पुढील काळात देखील ही पतसंस्था अशाच प्रकारे वाटचाल करीत राहणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष बाळासो खताळ, संचालक दादासो देवकाते, दीपक निंबाळकर, बाळासाहेब गोवेकर, विजय यादव, युवराज साळुंके, हनुमंत धापटे, भालेराव झारगड, राहुल साबळे, दीपक भोसले, पुष्पा रायते, संगीता काटे, सुनील घाडगे, संजय डेंगळे, नंदकुमार निंबाळकर, सचिव शिवाजी तांबे, सहसचिव दादासो साळुंखे तसेच सर्व सभासद वर्ग उपस्थित होते.





