Ganesh Visarjan News : पोलीस अधिकाऱ्यासह १३ जणांचा मृत्यू; गणेश विसर्जनावेळी घडल्या विविध दुर्घटना
Ganesh Visarjan News : गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान तेलंगणा राज्यातून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे.

Ganesh Visarjan News : तेलंगणा राज्यामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान घडलेल्या विविध दुर्घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत घडलेल्या या दुर्दैवी घटनांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह १३ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर २६ नागरिक जखमी झाले आहेत. ( Ganesh Visarjan News)
उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली असतानाही या अनपेक्षित घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू आहे. ( Ganesh Visarjan News)
तेलंगणात पार पडलेल्या विसर्जन सोहळ्यातील दुर्घटनांची सविस्तर माहिती पोलीस महासंचालकांनी माध्यमांसमोर मांडली. कर्तव्य बजावत असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा झालेला मृत्यू आणि सामान्य नागरिकांचा गेलेला जीव ही अतिशय वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. ( Ganesh Visarjan News)
मिरवणुकीतील गर्दी, पाण्याचा अंदाज न येणे अथवा वाहनांशी संबंधित अनपेक्षित तांत्रिक बिघाड यामुळे हे अपघात झाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ( Ganesh Visarjan News)
Pune News : बीजे मेडिकल वसतिगृहाच्या आवारात पाण्याची टाकी पाडताना एक जखमी; अग्निशमन दलाकडून जीवदान





