नगर,(प्रतिनिधी) – नगर शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन पार्किंगममधून दुचाकीसह १२ हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दि.१४ रोजी दुपारी चार ते सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शंकर आबाजी इरोळे (वय ३१ रा. कानडे मळा, सारसनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच १६ बीएक्स 5717) टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथील पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेथून दुचाकीसह त्याखाली ठेवलेली १२ हजाराची रोकड असा ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना सायंकाळी पावणे सहा वाजता लक्ष्यात आली. इरोळे यांनी १५ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस अंमलदार संगीता बडे अधिक तपास करत आहेत.