11th Admission 2025 : अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी! अजूनही ८ लाख जागा रिक्त
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता अतिवृष्टी, पूरस्थितीचे कारण देत प्रवेशाची शेवटची संधी दिली आहे. अकराव्या फेरीसाठी सोमवार (दि.६) पर्यंत नोंदणी कराईची असून प्रवेशाचे वेळापत्रक ७ ऑक्टोबरनंतर जाहीर होईल. अकरावीच्या २१ लाख ७१ हजार ५७८ जागांसाठी दहा फेऱ्यांनंतर १३ लाख ४२ हजार ४३८ प्रवेश दिले आहेत. प्रवेशाच्या ८ लाख २९ हजार १४० जागा रिक्त आहेत.या फेरीत विकल्प आणि नोंदणी सुविधा शेवटी देण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.





