Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ आज सकाळी तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. एका माथेफिरू व्यक्तीने अचानक परिसरातील तब्बल 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी सुरू आहे. Thane News Eknath Shinde प्राथमिक माहितीनुसार, आरोपीची मानसिक स्थिती तपासली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे ( Ekntha Shinde) यांच्या घराच्या अंतरावर घडलेल्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. सध्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Thane News हेही वाचा: Hinjewadi IT Park area : हिंजवडी माण आयटी पार्क परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित; रहिवाशांचे तीव्र आंदोलन