Breaking News : बहिणींच्या बँक खात्यात 10 हजारांची ओवाळणी; मुख्यमंत्र्यांची 25 लाख महिलांना विशेष भेट
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत २५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये वर्ग केले.

Breaking News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत २५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये वर्ग केले. या माध्यमातून एकूण २,५०० कोटी रुपयांचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थान १ अॅन मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात ही रक्कम वितरित करण्यात आली. या योजनेचा उद्देश स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १.८१ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळालेली रक्कम वापरली आहे, त्यांना पुढील टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता.
हे देखील वाचा :
Inflation rises : घाऊक महागाईचा भडका! सलग तिसऱ्या महिन्यात वाढ; जानेवारीत दर 1.81 टक्क्यांवर





