Bhagat Singh Koshyari: “राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले, पण त्यांनी…”; भगतसिंग कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला
Bhagat Singh Koshyari : राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, पण घाबरलं नाही पाहिजे, असे विधान माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
Bhagat Singh Koshyari: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून चांगलेच घेरले. याशिवाय या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनीही हजेरी लावली होती.
यावरून देखील राज ठाकरे यांनी सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीपोटी अनेक जण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा टोला लगावला.यावर आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, पण घाबरलं नाही पाहिजे, असे विधान माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी एक प्रकारे राज ठाकरे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
India Map: व्यापार कराराच्या दरम्यान अमेरिकेने रंग बदलले ; भारताच्या ‘त्या’ नकाशाची पोस्ट केली डिलीट
नेमकं काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी?
नाशिकमध्ये माध्यमांसोबत बोलताना भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमात आलेले ते सर्व मोदींना घाबरून नाही आले. मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मला असं वाटतं आहे की, राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी घाबरलं नाही पाहिजे, त्यांनी मोंदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. मोदींजींसाठी सर्व जनता समान आहे, ज्याप्रमाणे रामाला त्यांची सर्व प्रजा समाज होती, त्याप्रमाणे मोदींजींना देखील सगळे समान आहे.
राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहे. ते खूप चांगले, कडक नेते आहे. त्यांना मी सांगू इच्छितो मोदींना घाबरू नका, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आहात, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, घाबरायचं असेल तर चुकीचे काम करण्यास घाबरा,” असेही भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांचा विमान अपघात नाही तर शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला. त्यावर कोश्यारी यांनी रोहित पवार यांना घातपात झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असा सल्ला दिला.
“अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही,” असेही कोश्यारी म्हणाले.
हेही वाचा:






